इन्स्पेक्टरची आत्महत्या; पत्नीसह दोन मेव्हणे आरोपी
Breaking News | Beed Crime: परळीत रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या (Suicide) केली होती. यावेळी त्यांच्या खिशात चिठ्ठी सापडली.
बीड : पुणे सीआयडी विभागात कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक सुभाष दुधाळ यांनी परळीत रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली होती. यावेळी त्यांच्या खिशात चिठ्ठी सापडली होती. रेल्वे पोलिसांचा तपास सुरू असतानाच दुधाळ यांच्या बहिणीने ठाणे गाठत फिर्याद दिली आहे. त्यावरून पत्नीसह तिच्या दोन भावांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सुभाष दुधाळ (वय ४१, रा. भाग्यनगर, बीड) यांनी ९ मार्च रोजी
परळीत आत्महत्या केली होती. त्याबद्दल दुधाळ यांची बहीण शकुंतला बंडकर (रा. डोर्ली, जि. सांगली) यांनी रेल्वे पोलिस ठाण्यात दुधाळ यांची पत्नी शीतल तसेच तिचा भाऊ संतोष मस्के व अंकुश मस्के यांच्याविरोधात तक्रार केली एका महिलेसोबत दुधाळ यांचे अफेअर असल्याचा तिघांना संशय होता. त्यावरुन दुधाळ यांना त्यांची पत्नी व मेहुण्यांकडून एसपींकडे तक्रार देण्याची धमकी देऊन मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे.
Web Title: Inspector’s Suicide; Two brothers-in-law along with his wife are accused
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study