Home अहमदनगर अहमदनगर: निरीक्षक लाचेच्या जाळ्यात

अहमदनगर: निरीक्षक लाचेच्या जाळ्यात

Breaking News | Ahmednagar:  बीअर बार परमिट रूमवर कारवाई न करण्याकरिता तक्रारदाराकडून ११ हजारांची लाच घेणारा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचा सहायक दुय्यम निरीक्षक लाचलुचपत विभागाने पकडला. (Bribery)

Inspector in the net of bribery

कोपरगाव: देशी दारू विक्रीचा – व्यवसाय सुरळीत चालू ठेवण्यासाठी तसेच बीअर बार परमिट रूमवर  कारवाई न करण्याकरिता तक्रारदाराकडून ११ हजारांची लाच  घेणारा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचा सहायक दुय्यम निरीक्षक लाचलुचपत विभागाने कोपरगावमध्ये पकडला आहे.

खलील खुर्शीद शेख (वय ४०, रा. – खडकी रोड, कोपरगाव) असे लाचखोर सहायक दुय्यम निरीक्षकाचे नाव आहे. शेख याच्या विरोधात कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक पथकाच्या पोलिस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी कोपरगावमध्ये ही कारवाई केली. २५ वर्षीय तक्रारदार शासनमान्य देशी दारू विक्रेता असून त्याचा व्यवसाय सुरळीत चालू देण्यासाठी श्रीरामपूर भरारी पथकाचा सहायक दुय्यम निरीक्षक शेख याने अकरा हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

Web Title: Inspector in the net of bribery

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here