Home नाशिक अल्पवयीन मुलीने नकार देताच मुलाकडून धमकी, मुलीला नेले घरी आणि…

अल्पवयीन मुलीने नकार देताच मुलाकडून धमकी, मुलीला नेले घरी आणि…

Breaking News | Nashik Crime: मैत्रीत अल्पवयीन मुलीचा एकाने विनयभंग केल्याचा प्रकार.

minor girl refused, the boy threatened her, took the girl home

नाशिक: मैत्रीत अल्पवयीन मुलीचा एकाने विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. एका मुलाने मुलीस रिलेशनशिप मध्ये राहण्यास जबरदस्ती केली आहे. ती नकार देताच मुलाने धमकावत आपल्या घरी नेल्याने हा प्रकार पोलिसांत पोहोचला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

एक संशयिताने मुलीस धमकावत आपल्या घरी घेऊन गेला. हा प्रकार नाशिक येथे घडला असून सरकारवाडा पोलीस ठाण्यातहा प्रकरण पोहोचला आहे. बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पॉक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, अमन पठाण (रा. जाकिर हुसेन हॉस्पिटलजवळ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयिताने अल्पवयीन मुलीशी मैत्री करीत हे कृत्य केले. गेल्या आठ महिन्यात संशयिताने अल्पवयीन मुलीला रिलेशन शिपमध्ये राहण्यास जबरदस्ती केली, असे पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. मुलीने नकार देताच त्याने कुटूंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी देत गोळे कॉलनीतील एका मेडीसीन एजन्सीत व बोट क्लबच्या आवारात घेवून जात तिचा विनयभंग केला. तसेच मुलीस तो महाविद्यालयातून परस्पर आपल्या घरी घेवून गेला.

रात्री बराच वेळ उलटूनही मुलगी घरी न परतल्याने कुटूंबीयांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात धाव घेतली. या घटनेची कुणकुण लागताच संशयिताने नातेवाईकांना सोबत घेत मुलीस कुटूंबीयांच्या स्वाधिन केले असून तिने आपबिती कथन केल्याने याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Breaking News: minor girl refused, the boy threatened her, took the girl home

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here