महागाईचा भडका: कॉंग्रेसने केला केंद्रसरकारवर हल्लाबोल, तहसीलसमोर निदर्शने
पाथर्डी | Pathrdi: देशात एकीकडे कोरोनाचे संकट उभे असून आर्थिक तुट निर्माण झाली आहे. याच संकटात अनेकांचे रोजगार गेले आहे. सर्व सामान्य लोकांच्या हाताशी पैसा नाही मात्र दुसरीकडे केंद्रसरकार नागरिकांना महागाईचे चटके देत आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. केंद्रसरकारविरोधात लोकांमध्ये चीड निर्माण झाली आहे.
या महागाईच्या निषेधार्थ काँग्रसने निदर्शने केली आहे. या वाढलेल्या महागाईला केंद्रसरकार जबाबदार असून पाथर्डी तालुका कॉंगेस पक्षाकडून तहसील कार्यालयासमोर घोषणा देऊन रोष व निषेध व्यक्त केला आहे.
केंद्र सरकार डीझेल, पेट्रोलच्या किमती (निवडणूक कालावधी ६६ दिवस वगळता) सातत्याने वाढवत आले आहे. घरगुती गॅस, तसेच खतांच्या किमती मोठूया प्रमाणावर वाढविल्या आहेत. यामुळे किराणा वस्तू व घरगुती अत्यावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. या महागाईच्या लाटेत सर्व सामान्यापासून सर्वच जण भरडले जात आहे. केंद्र सरकार दुहेरी आर्थिक लुट करत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. कॉंग्रेसने याबाबत नायब तहसीलदार पंकज नेवसे यांच्याकडे निवेदन सुपूर्द केले आहे.
Web Title: Inflation erupts Congress attacks central government