इंदुरीकर यांच्या अडचणीत वाढ: खटल्यात अनिस मांडणार बाजू
संगमनेर: पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन करणारे विधान इंदुरीकर महाराजांनी आपल्या विविध कीर्तनामध्ये जाहीरपणे केले होते. या तक्रारीनुसार घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भवर यांनी पीसीपीएनडीटी कायद्यान्वये १९ जूनला संगमनेर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता.
या वादग्रस्त विधानावरून न्यायालयीन कचाट्यात अडकलेल्या समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या अडचणीत शुक्रवारी वाढ झाली.
अंनिस कडून अॅड. रंजना यांनी दाखल करण्यात आलेला अर्ज संगमनेरच्या सत्र न्यायालयाने आज मंजूर केला आहे. त्यामुळे खटल्याला स्थगिती दिल्याच्या प्रकरणात सरकारी वकिलांसोबतच अंनिस चा युक्तिवाद ऐकूनच न्यायालयाला निर्णय घ्यावा लागणार आहे, असे स्पष्ट झाले आहे. आता अंनिसला आपली बाजू लेखी स्वरूपात मांडण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे.
या प्रकरणाची पुढील सुनावणी २८ ऑक्टोबरला होणार आहे. त्यावेळी खटल्याला स्थगिती दिल्याच्या प्रकरणावर कामकाज सुरू होईल. इंदोरीकरांच्या वकिलांचा युक्तिवाद तसेच सरकारी वकील आणि अंनिस यांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाला त्यावर निर्णय घ्यावा लागणार आहे. आता खटला कोठे सुरु होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
See: Latest Entertainment News, Latest Marathi News, and Latest Marathi News Live
Web Title: Indurikar Maharaj difficulty increases