इंदोरीकर महाराजांनी सांगितले कोव्हीडला हरविण्याचे चौथे सूत्र
राहता: समाजप्रबोधनकार प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (Indorikar Maharaj) यांनी कोरोनाला हरविण्याचे चौथे सूत्र सांगितले आहे. मास्क वापरणे, हात वारंवार धुणे, आणि सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीसोबतच मनात खंबीरपणा ठेवणे हे चौथे सूत्र कोरोनाला हरविण्यासाठी उपयुक्त आहे.
मनाचा दुबळेपणा हा कोरोनापेक्षा महाभयंकर रोग आहे. कोरोना विरुद्ध खंबीरपणे लढा देण्याचे आवाहन इंदोरीकर महराजांनी केले आहे.
पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने विखे पाटील महाविद्यालयातील वसतिगृहात ४०० बेडचे प्रवरा कोविड केअर सेंटरचे लोकार्पण इंदुरीकर महाराज यांच्या हस्ते झाले.यावेळी इंदोरीकर महाराजांनी थोडक्यात पण आपल्या प्रभावी भाषाशैलीत भाषण केले. कोरोनामुळे माणसांना माणुसकी कळली. पैसा व सत्तेपेक्षा माणसाला देव महत्वाचा वाटू लागला. माणसाला समाजाची गरज वाटू लागली. मी स्वतःला कोरोना होऊ देणार नाही असा दृष्टीकोन आपल्या सर्वाना ठेवावा लागणार आहे.
Web Title: Indorikar Maharaj said against the fourth formula of defeating Corona