इंदोरीकर महाराज यांची सुनावणीची तारीख २५ नोव्हेंबर
संगमनेर: समाजप्रबोधनकार निवृत्तीनाथ देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी केलेल्या मुल जन्मसंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानावरून त्यांच्यावर संगमनेर प्रथम वर्ग न्यायालयात गर्भधारणा पूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायाद्यान्वये फिर्याद दाखल केलेली असून संगमनेर सत्र न्यायालयात सुनावणी सुरु आहे. न्यायालयाने पुढील सुनावणीची तारीख २५ नोव्हेंबर दिली आहे.
देशमुख महाराज यांनी मुलाच्या जन्म संदर्भात वादग्रस्त विधान केले होते. या आरोपावरून संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भवर यांनी १९ जूनला फिर्याद दिली होती..
याप्रकरणी अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या वतीने अॅड. रंजना पवार यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल केला होता. त्यावर महाराजांचे वकील धुमाळ यांनी हरकत घेतली होती. मात्र हा दाखल केलेला अर्ज सुनावणी दरम्यान न्यायालयाने मंजूर केला होता. त्यावेळी पुढील तारीख २८ ऑक्टोबर देण्यात आली होती. यावर आता पुन्हा पुढील तारीख २५ नोव्हेंबर देण्यात आली आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Indorikar Maharaj hearing date is November 25