Fire: एकतर्फी प्रेमातून तरुणाने इमारतीला लावली आग, सात जणांचा मृत्यू
Indore Fire case | भोपाळ: इंदौर येथील विजय नगर भागात असलेल्या स्वर्णबाग कॉलनीत एका इमारतीला लागलेल्या आगीबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे. या इमारतीच्या सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. काल सायंकाळी ही आग लावण्यात आली या आगीचे कारण आता पुढे आले आहे. कारण ऐकून अनेकांना धक्काच बसला आहे. या प्रकरणातील आरोपी सहा महिन्यांपूर्वी याच इमारतीत भाड्याने राहत होता. एकतर्फी प्रेम आणि पैशाच्या वादातून त्याने आग लावल्याचे समोर आले आहे. या कृत्यामुळे सात जणांना जीव गमावावा लागला आहे.
मूळचा झाशीचा रहिवासी असलेल्या संजय तथा शुभम दीक्षित याने ही भीषण आग लावल्याचे तपासात समोर आले आहे. प्रेमात तो वेढा झाला होता. त्याचे एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. त्यामुळे तो झाशीतून इंदौर येथे राहण्यास आला आहे. इंदूरचे पोलीस आयुक्त हरिनारायण मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पागल प्रियकर शुभम याने आधी एका तरुणीवर लग्नासाठी दबाव टाकला आणि मुलीने नकार दिल्याने रागाच्या भरात त्याने ही भीषण आग (Fire) लावली. अनाठायी प्रेमातून आरोपीने तरुणीची गाडी पेटवली आणि इमारतीला मोठी आग लागली. या घटनेत 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर जळालेल्या 8 जणांवर उपचार सुरु आहेत.
Web Title: Indore Fire Case