धक्कादायक! भारतीय क्रिकेट खेळाडूच्या वडिलांना अटक, बँकेत केला घोटाळा
Indian Cricketer Father Arrested: भारतीय माजी खेळाडू आणि यष्टिरक्षक फलंदाज नमन ओझा यांचे वडील विनय ओझा यांना पोलिसांनी अटक केली आहे. या खेळाडूच्या वडिलांवर ५० लाख रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला आहे. विनय ओझा यांना ६ जून रोजी मध्यप्रदेशातील बैतुल मुलताई येथून अटक करण्यात आली आहे.
विनय ओझा हे जौलखेडा या गावात बँक ऑफ महाराष्ट्र च्या शाखेत कार्यरत होते. तत्कालीन बँक व्यवस्थापकावर फसवणुकीसह इतर कलामान्वे गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर विनय ओझा फरार झाले होते. पोलीस त्यांच्या शोधात होती. अखेर ६ जून रोजी बैतुल मुलताई येथून अटक करण्यात आली आहे.
२०१३ मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत तैनात असलेले जौलखेडा व्यवस्थापक अभिषेक रत्नम, विनय ओझा आणि आणखी एक अशा तिघांनी मिळून बनावट नाव आणि फोटोच्या आधारे किसान क्रेडीट कार्ड बनवून बँकेतून पैसे काढले होते. तरोडा येथील वृद्ध रहिवासी दर्शन वडील शिवलू यांच्या निधनानंतरही त्यांच्या नावावर खाते उघडून पैसे काढले होते. तसेच अन्य शेतकऱ्यांच्या नवे क्रेडीट कार्ड बनवून सुमारे १ कोटी २५ लाख रुपये काढण्यात आले.
Web Title: Indian Cricketer Father Arrested