Home पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील मुलींच्या वसतिगृहातील धक्कादायक प्रकार समोर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील मुलींच्या वसतिगृहातील धक्कादायक प्रकार समोर

Breaking News | Pune: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठमधील मुलींच्या वसतीगृहामधील मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या सिगरेटची पॉकेटचे फोटो आणि विडिओ समोर आले.

Incidents in girls' hostel at Savitribai Phule Pune

पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यामधून धक्कादायक घटना समोर आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठमधील मुलींच्या वसतीगृहामधील मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या सिगरेटची पॉकेटचे फोटो आणि विडिओ समोर आले आहेत. वसतिगृहात वास्तव्य करत असलेल्या एका विद्यार्थीनीने या सर्व गैरप्रकारची तक्रार वसतिगृह महिला अधिकारी यांच्याकडे वारंवार केली होती. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी कोणती कारवाई केली नाही. त्यानंतर संबंधित विद्यार्थीनी प्रभारी कुलसचिव आणि कुलगुरू यांना पत्र लिहून हा सर्व घटनाक्रम सांगितला आहे. सगळ्यात महत्त्वाचे मुलींच्या वसतिगृह गेटवर बायोमेट्रिक उपकरणे आहेत. असे असताना येवढ्या मोठ्या प्रमाणात दारू आणि इतर नशेच्या गोष्टी आत कशा जातात? असे अनेक सवाल आता उपस्थित झाले आहेत.

विद्यापीठमधील एका मुलीने आपल्या खोलीमधील चार विद्यार्थिनी चार विद्यार्थिनी मद्यप्राशन करून सिगारेट ओढत असल्याची तक्रार केली होती. वसतीगृहाच्या महिला अधिकाऱ्यांनी फार काही लक्ष दिले नाही. संबंधित कुलगुरू आणि प्रभारी कुलसचिव यांना पत्र लिहून हा सर्व घटनाक्रम सांगितला. शेवटची दोन महिने बाकी असल्याने त्याने सांगून त्यांच्यावर कारवाई करण्याचं टाळलं. शिवीगाळ करत त्या विद्यार्थिनीला धमकावलं. त्यासोबतच रंगावरून हिणवल्याचंही पीडित विद्यार्थिनीने आपल्या पत्रात म्हटलं आहे. संबंधित विद्यार्थिानीला तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचे समोर आले आहे.

Web Title: Incidents in girls’ hostel at Savitribai Phule Pune

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here