Home संगमनेर संगमनेर: घरातील ओट्यावर झोपलेल्या महिलेसोबत संतापजनक घटना

संगमनेर: घरातील ओट्यावर झोपलेल्या महिलेसोबत संतापजनक घटना

Breaking News | Sangamner Crime: विद्यालयाजवळील घराच्या बाहेर ओटपामर झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील सुमारे पावणे दोन तोळे सोन्याचे दागिने अज्ञात बोरट्याने लांबविल्याची संतापजनक घटना.

incident with a woman sleeping on the floor of the house

संगमनेर शहराजवळील घुलेवाडी येथील महात्मा फुले विद्यालयाजवळील घराच्या बाहेर ओटपामर झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील सुमारे पावणे दोन तोळे सोन्याचे दागिने अज्ञात बोरट्याने लांबविल्याची घटना शुक्रवारी (दि. २५) पहाटे पडली आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सुगंधा सुदाम राऊत (वय  ७०) ही वृद्ध महिला पतीसह उन्हाळा असल्याने घराच्या बाहेरील ओट्यावर झोपलेली होती. चोरट्याने हिच संधी साधून मध्यरात्रीनंतर पहाटे पाच बाजेपर्यंत तिच्या गळ्यातील ४५ हजार रूपये किमतीचे दीड तोळे वजनाचे मणी मंगळसूत्र व नऊ हजार रूपये किंमतीचे तीन ग्रॅम बजनाचे सोन्याचे डोरले असे सुमारे ५४ हजार रुपये किंमतीचे पावणे दोन तोळे वजनाचे सोन्याचे दानिने चोरुन पोबारा केला आहे. याप्रकरणी वृद्ध महिलेने शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळी व संध्याकाळी फिरण्यासाठी जाणान्या महिलांच्या गळ्यातून दागिणे ओरडणारी टोळी सक्रिय आहे. तर आता उन्हाळ्यामुळे घराबाहेर झोपणाऱ्या महिलाना लक्ष करून त्यांच्या गळयातून दागिणे ओरबाडले जात असून नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेने नागरिक संताप व्यक्त करीत आहे.

Breaking News: incident with a woman sleeping on the floor of the house

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here