आश्रमशाळेत अधीक्षकाचा मुलीसोबत धक्कादायक प्रकार
Breaking News | Nanded Crime: आश्रम शाळेतील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना. (Molested)
नांदेडमध्ये आश्रम शाळेतील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्ररकरणी वसतिगृह अधीक्षकावर गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
आरोपीने अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिला ‘आय लव्ह यू, माझ्यासोबत चल’ असे म्हणत विनयभंग केला. तसंच मुलीच्या अंगाला वाईट पद्धतीने स्पर्श केला. याप्रकरणी आरोपीविरोधात कुंडलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला होता. पण पोलिसांनी अवघ्या काही तासांत त्याला बेड्या ठोकल्या.
मिळालेली अधिक माहिती अशी की, नांदेडच्या बिलोली तालुक्यातील एका आश्रम शाळेत ही घटना घडली. चाळीस वर्षीय वसतिगृह अधीक्षक गजानन राजरवाडने शाळेतीलच अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. आरोपीने अल्पवयीन मुलीचा हात पकडून ‘तू मला खूप आवडतेस, आय लव्ह यू, तू माझ्यासोबत चल, आपण कारमध्ये बसू.’ असे म्हणत मुलीचा विनयभंग केला.
तसेच अल्पवयीन मुलगी ही तिच्या खोलीमध्ये तिच्या मैत्रिणीसोबत झोपलेली असताना वसतिगृह अधीक्षकाने तिच्या अंगाला वाईट पद्धतीने स्पर्श केला. याप्रकरणी आरोपी गजानन राजरवाडविरोधात कुंडलवाडी पोलिस ठाण्यात पोस्को आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
Breaking News: incident of superintendent with girl in ashram school