संगमनेरात रात्री महिला जिन्याचे गेट लावण्यास गेली अन घडली धक्कादायक घटना
Breaking News | Sangamner: कपाटातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण १ लाख ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल तिघा चोरट्यांनी चोरून नेला.
संगमनेर: शुक्रवारी रात्री ११:५० वाजेच्या सुमारास शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अष्टविनायकनगर, विडी कामगार वसाहतीजवळ जिन्याचे गेट लावणाऱ्या महिलेला चोरट्यांनी भिंतीवर ढकलून देत घरात प्रवेश केला. कपाटातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण १ लाख ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल तिघा चोरट्यांनी चोरून नेला.
या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तिघा चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवून घेतला. मोनिका दत्तात्रेय थोरात (वय २६, रा. अष्टविनायकनगर, विडी कामगार वसाहतीजवळ, संगमनेर) यांनी फिर्याद दिली आहे. रात्री ११:५० वाजेच्या सुमारास थोरात या जिन्याचे गेट लावत होत्या. त्यावेळी पाठीमागून आलेल्या तिघांनी त्यांना भिंतीवर ढकलून दिले. थोरात घाबरून बेडरूममध्ये गेल्या. त्यांनी आतून कडी लावून घेतली. तिघांनी घरात प्रवेश करत दुसऱ्या बेडरूममधील कपाटात ठेवलेल्या चावीने कपाटाचे लॉकर उघडले. त्यातील सोन्याचे दागिने त्यात साडेतीन तोळे गंठन, सहा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन त्यात चार ग्रॅम वजनाचे ओम पान, पाच ग्रॅम वजनाची, साडेतीन ग्रॅम वजनाची, चार ग्रॅम वजनाची व दीड ग्रॅम वजनाच्या चार अंगठ्या, दीड तोळे वजनाची सोन्याची पोत व त्यात काळे मणी, पेंडेंट तसेच इतरही दागिने आणि पाच हजार रुपये रोख असा एकूण १ लाख ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल तिघा चोरट्यांनी चोरून नेला. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख, पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग अधिक तपास करीत आहेत.
Web Title: incident occurred when a woman went to install a stair gate at night