Home नाशिक मी सत्य बोलतो म्हणून अडचणीत: इंदोरीकर महाराज

मी सत्य बोलतो म्हणून अडचणीत: इंदोरीकर महाराज

Indurikar Maharaj: मी नेहमी सत्य व खरे बोलतो. कोणीतरी खरे बोलले पाहिजे. परंतु माझ्या बोलण्याचा उलटा अर्थ लावला जातो. सत्य बोलल्याने अडचणीत येत असल्याचे प्रतिपादन हभप इंदोरीकर महाराज देशमुख यांनी केले.

In trouble because I speak the truth, Indurikar Maharaj

मालेगाव: मी नेहमी सत्य व खरे बोलतो. कोणीतरी खरे बोलले पाहिजे. परंतु माझ्या बोलण्याचा उलटा अर्थ लावला जातो. सत्य बोलल्याने अडचणीत येत असल्याचे प्रतिपादन हभप इंदोरीकर महाराज देशमुख यांनी केले. रावळगाव (ता. मालेगाव) येथे अखंड हरीनाम सप्ताह निमित्त झालेल्या कीर्तन सोहळ्यात ते बोलत होते.

शिक्षणाचा दर्जा घसरल्यामुळे कौटुंबिक समस्या वाढत आहेत. शेतकऱ्याच्या घरात काम करणारे कमी झाले. यात मजुरांचा दोष नाही. दोन मिनिटांचा राग माणसाला आयुष्यातून संपवितो.

यावेळी इंदोरीकर महाराज म्हणाले, की मी सातत्याने सत्य व खरे बोलत असतो. धर्मासाठी सत्य बोलले पाहिजे. श्रावण महिन्यात महिनाभर उपवास करणाऱ्यांची मला किव येते. एवढे उपवास करून शरीराला त्रास का करून घेता ? सर्व माणसे एकाच देवाचे लेकरे आहेत. वारकरी संप्रदायात एकच जात आहे, ती म्हणजे माणूस. ८० टक्के लोकांना बापाची संपत्ती सांभाळता येत नाही. सध्या व्यसनांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. प्रत्येक गावात जवळपास ९१ टक्के तरुण दारू पितात. ४० टक्के मुले कॉलेजला जात नाहीत.

सध्या मजूर टंचाई सगळीकडे जाणवते. यात मजुरांचा काही दोष नाही. खरे कारण म्हणजे शेतकऱ्यांच्या घरातील काम करणारे कमी झाले.

पहिली ते नववीपर्यंत परीक्षा नाही. दहावीतील काही मुलांना इंग्रजी हे नाव सुद्धा इंग्रजीत लिहिता येत नाही. शिक्षणाचा दर्जा घसरल्यानेच कौटुंबिक समस्या वाढल्या आहेत. मोबाईल व सोशल मीडिया धोकादायक ठरत आहे. अल्पवयीन मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे.

व्यसनामुळे तरुण मुलांचा मृत्यू होत आहे. मी व्हॉटसॲप, फेसबुक वापरत नाही. माझ्या बोलण्याचा उलटा अर्थ लावला जातो. रागावर नियंत्रण ठेवून अहंकार सोडा. मिळविण्यापेक्षा टिकविणे महत्त्वाचे आहे. तरुणांनी धर्म आणि संस्कृतीसाठी जगले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. यावेळी हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

इंदोरीकर महाराजांनी त्यांच्या ओघवत्या शैलीत विविध विषयांवर भाष्य करत अप्रत्यक्षपणे अनेकांचे चिमटे काढले. हास्याच्या फवाऱ्यातून समाजप्रबोधनाचे पाठ गिरविले. ते म्हणाले, की गावागावात राजकारणात चढाओढ चालते. वादविवाद होतात. तुम्ही गाव पातळीवर आपसात लढतात. जरा वरचे राजकारण काय चालू आहे ते पहा. कोणी हूं की चूं म्हणत नाही. सध्या दुष्काळाचे सावट पसरले आहे. निवडणुकीच्या वेळी गावपातळीवरील पुढारी शेतमळ्यांमध्ये पोहचून प्रचार करतात.

निवडणूक काळात सातत्याने संपर्कात असतात. पुढाऱ्यांनो दुष्काळाच्या या परिस्थितीत बांधावर जाऊन बळीराजाला धीर द्या. अडचणीच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहा. गावागावातील एकोपा टिकवून ठेवा असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: In trouble because I speak the truth, Indurikar Maharaj

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here