बारावीचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी महत्त्वाची बातमी
HSC Exam 2023: कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे. निकाल उशिराने लागण्याची शक्यता.
HSC Exam 2023: बारावीचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी महत्त्वाची बातमी . बारावीचा निकाल उशिराने लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे. त्यावर अजूनही तोडगा निघालेला नाही.
महाविद्यालयीन शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे बारावीच्या 50 लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत. अशीच हीच स्थि ती कायम राहिल्यास बारावीच्या निकालास विलंब होण्याची शक्यता आहे. शिक्षकांच्या मागण्यांबाबत शिक्षणमंत्री आणि संघटनांची बैठक पार पडली. मात्र या बैठकीची माहिती न मिळाल्यानं शिक्षक बहिष्कारावर ठाम आहेत. गेल्या 7 दिवसांत झालेल्या पेपरच्या जवळपास 50 लाख उत्तरपत्रिका महाविद्यालय आणि कस्टडी स्तरावर तपासणीच्या प्रतीक्षेत पडून आहेत. यामुळे निकाल उशिराने लागण्याची चिन्ह निर्माण झाले आहे.
Web Title: Important news for Class HSC Exam 2023 students and their parents
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App