पुतण्यासोबत अनैतिक संबंध, तिहेरी हत्याकांड, पुतण्यानं काकूसह दोन चिमुकल्यांना पेट्रोल टाकून जाळलं
Pune Crime: सख्ख्या पुतण्यानंच आपली काकू आणि तिच्या दोन चुमकल्यांना पेट्रोल टाकून जाळल्याची घटना. तिहेरी हत्याकांडानं (Murder) पुण्यातील पिसोळी हादरलं.
पुणे: पुण्यामधून एक धक्कादायक व भयानक घटना घडली आहे, तिहेरी हत्याकांडानं पुण्यातील पिसोळी हादरलं आहे. सख्ख्या पुतण्यानंच आपली काकू आणि तिच्या दोन चुमकल्यांना पेट्रोल टाकून जाळल्याची घटना घडली आहे. वैभव वाघमारे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे, तर आम्रपाली वाघमारे असं मृत महिलेचं नाव आहे. अनैतिक संबंधातून हे हत्याकांड घडल्याची माहिती समोर येत आहे. आरोपी वैभव वाघमारे याला अटक करण्यात आली असून, तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मिळालेली माहिती अशी की, आम्रपाली वाघमारे या महिलेचे तिचा पुतण्या वैभव वाघमारे याच्यासोबत अनैतिक संबंध होते. ती वैभवसोबत पुण्यातील पिसोळी परिसरात राहत होती. मात्र आम्रपालीचे आणखी कोणासोबत तरी अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीला होता. यातून त्यांचा वाद झाला. वादानंतर रागाच्या भरात वैभवनं आम्रपाली तिची सहा वर्षांची मुलगी रोशनी व चार वर्षांचा मुलगा आदित्य यांची गळा दाबून हत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने तिघा मायलेकरांची हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह खोलीच्या समोरील पत्र्याच्या शेडमध्ये आणला. त्यानंतर घरातील कपडे, बेडशीट व लाकडच्या साह्याने पेट्रोल टाकून मृतदेह जाळण्यात आले. बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. आरोपी वैभव वाघमारे याला अटक करण्यात आली असून, अधिक तपास सुरू अल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Web Title: Immoral relationship with nephew, triple murder, nephew burnt aunt
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App