अनैतिक संबंध, डोक्यात दगड घालून पत्नीला मारले अन् रात्रीच मृतदेह नदीकाठी जाळला
Breaking News | Solapur Crime: अनैतिक संबंधाच्या (Immoral relationship) संशयातून वाद झाल्याने पतीने पत्नीचा झोपेतच डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस.
सोलापूर: अनैतिक संबंधाच्या संशयातून वाद झाल्याने पतीने पत्नीचा झोपेतच डोक्यात दगड घालून खून केला, नंतर रात्रीच भीमा नदीकाठी पत्नीचा मृतदेह जाळून टाकला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेलगाव येथे ही मन सुन्न करणारी घटना सोमवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी मंद्रूप पोलिस ठाण्यात पतीसह त्याच्या भावा विरोधात खून आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल झाला आहे. भाग्यश्री बसवराज कोळी (वय २७) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
भाग्यश्री बसवराज कोळी (सर्व रा. तेलगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत चंद्रकांत कोळी यांनी फिर्यादी दिली असून, पोलिसांनी पती बसवराज आडव्याप्पा कोळी, शिवानंद आडव्यापा कोळी व गजानन आडव्याप्पा कोळी अशी या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, , तेलगाव येथील आरोपीचा भाग्यश्रीसोबत 2014 साली विवाह झाला होता. त्यांना मुलगा आणि मुलगी अशी दोन अपत्ये झाली. दरम्यान मागील दोन वर्षांपासून आरोपीचे कुटुंब निम्बर्गीतील शेतात राहत होते.
काही दिवसांपूर्वी आरोपी सासरवाडी लोणी येथे गेला असता त्याची पत्नी कोणतेही काम करत नाही, सतत शारीरिक संबंध ठेवत असे. तसेच ती कोणासोबत तरी फोनवर बोलते व भेटते असे सांगत तिच्यावर संशय घेत होता. त्यामुळे त्यांच्यात सारखे वाद होतात, असे तक्रारीत म्हटले आहे.
22 जून रोजी आरोपी पतीने फिर्यादी मेव्हुना याला तेलगाव येथे बोलविले आरोप केला. तुझी बहीण भाग्यश्रीचे चारित्र चांगले नाही. तिचे निंबर्गी येथील एका पुरुषासोबत नाते आहे, तिच्याकडे मोबाईल आहे. मागितले असता ती मोबाइल बाबत काही एक सांगत नाही. तिच्या जवळील मोबाइल काढून घे, असे सांगताच त्याने तिच्याकडील मोबाइल काढून दिले.
रविवार, 23 जून 2024 रात्री जेवण करून झोपल्यानंतर आरोपीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून केला. याची माहिती लोणी येथे लहान भावाला दिली. त्याने फिर्यादीला याची माहिती दिली. या घटनेनंतर फिर्यादी आई-वडील आणि भावांना याची माहिती देऊन तेलगावकडे निघाला. दरम्यान, आरोपींनी मयत भाग्यश्रीवर अंत्यसंस्कार केल्याचे सांगितले. अधिक तपास मंद्रूपचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत हुले करीत आहेत.
Web Title: Immoral relationship, killed his wife with a stone on her head
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study