Home नागपूर मी आत्महत्या करतेय, माझ्या आईला सांगू नका, महिला पोलिस प्रशिक्षणार्थ्यानेची आत्महत्या

मी आत्महत्या करतेय, माझ्या आईला सांगू नका, महिला पोलिस प्रशिक्षणार्थ्यानेची आत्महत्या

Breaking News | Nagpur Crime:  युवकाने अन्य तरुणीसोबत लग्न केले. वसतिगृहावरील पाण्याच्या टाकीच्या पायऱ्यांना ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना.

I'm Committing Don't Tell My Mother Suicide news

 

 

नागपूर: मी आत्महत्या करतेय, माझ्या आईला याबाबत सांगू नका, तिला जबर धक्का बसेल; या आशयाची चिठ्ठी लिहून महिला पोलिस प्रशिक्षणार्थ्याने आत्महत्या केली. ही घटना सुरेंद्रनगरमधील पोलिस प्रशिक्षण केंद्रात उघडकीस आली. या घटनेने महिला पोलिस प्रशिक्षणार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रतीक्षा भोसले (वय २६, रा. इंदापूर, पुणे),असे मयत तरुणीचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक्षाचे लग्न झाल्यानंतर ती पतीसोबत राहायची. लग्नाच्या काही दिवसांनंतरच पती-पत्नीमध्ये वाद व्हायला लागला. ती पतीपासून वेगळी राहायला लागली. तिने अभ्यास केला. मुंबई पोलिस दलात दाखल झाली. फेब्रुवारी महिन्यापासून ती व अन्य सुमारे एक हजार महिला सुरेंद्रनगरमधील पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घ्यायला लागले.

यादरम्यान तिची एका युवकासोबत मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. काही दिवसांपूर्वी युवकाने अन्य तरुणीसोबत लग्न केले. याबाबत प्रतीक्षाला कळाले. ती तणावात राहायला लागली. मंगळवारी मध्यरात्री प्रतीक्षाने वसतिगृहावरील पाण्याच्या टाकीच्या पायऱ्यांना ओढणी बांधून गळफास घेतला. सकाळी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी बजाजनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Web Title: I’m Committing Don’t Tell My Mother Suicide

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here