अकोले: अवैध ६ लाखांची दारू पकडली, दोघांना ताब्यात
Breaking News | Akole Crime: अवैध दारू तस्करी करणारे दोन आरोपी व पाच लाख चौऱ्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कोतूळ : येथील अवैध दारू तस्करी करणारे दोन आरोपी व पाच लाख चौऱ्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गेल्या काही महिन्यांपासून कोतूळ येथील अवैध दारू आणि मटका चर्चेत आला. या धंद्याचे राजकीय नेते आश्रयदाते असल्याचे समोर आले. यामुळे अकोले पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील इथल्या अवैध दारू विक्रीवर नजर ठेवून होते.
गुरुवारी सकाळी दहा वाजता कोतूळ येथील बंद पडलेल्या विश्रामगृहात सफेद रंगाची काळ्या काचा असलेली बोलेरो एमएच १४ डीएक्स ८८५३ गाडी आली. गोपनीय माहितीनुसार, पोलिस हवालदार अनिल जाधव यांनी पाळत ठेवून पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांना कळवले. तातडीने झडती घेतली असता गाडीत तेहतीस हजार सहाशे रुपयांचे देशी दारूचे दहा बॉक्स व पाचशे, दोनशे, शंभरची ४० हजार पाचशे रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही दारू कोतूळ येथील अवैध अड्ड्यावर विक्रीसाठी दारू आली होती. गाडी चालक अशुतोष बाळू गुंजाळ (रा. गुंजाळवाडी संगमनेर), अक्षय मारुती वाकचौरे (रा. परखतपूर, ता. अकोले) यांना ताब्यात घेण्यात आले. या कामी पोलिस हेड कॉन्स्टेबल महेंद्र गुंजाळ यांनी फिर्याद दिली. सहायक पोलिस निरीक्षक बाजीराव गवारी यांच्या उपस्थितीत ही कारवाई केली. या कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
Web Title: Illegal liquor worth 6 lakhs caught, two arrested
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study