बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत लाचेची मागणी, पोलीस उपनिरीक्षकासह हवालदार एसीबीच्या पिंजऱ्यात
Sindhudurg Crime: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पोलस उपनिरीक्षकासह हवालदाराला लाच (Bribe) घेताना रंगेहाथ पकडल्याची कारवाई केली.
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गात धक्कादायक बातमी समोर आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पोलस उपनिरीक्षकासह हवालदाराला लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई काल (20 एप्रिल) करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचत त्या दोघांना 20 हजार रुपयांची रोख रक्कम घेताना पकडले आहे. या कारवाईनंतर त्या दोघांच्या घरावर लाचलुचपतच्या पथकाने छापा टाकला असून त्यांच्या मालमत्तेसह कागदपत्रांची चौकशी सुरु आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, याप्रकरणी तक्रार देणाऱ्या तक्रारदाराला तुझ्याविरोधात कलम 376 अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करतो अशी धमकी पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील आणि हवालदार मारुती साखरे या दोघांनी दिली होती. तसेच तक्रारदाराकडे 40 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यातील 20 हजार रुपये देण्याचे ठरले होते.
त्यानुसार तक्रारदाराने सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार केली. दरम्यान ठरल्यानुसार लाचलुचपतच्या पथकाने या ठिकाणी सापळा रचला त्या दोघांना 20 हजार रुपयांची रोख रक्कम घेताना रंगेहाथ पकडले. लाच स्वीकारल्याप्रकरणी वैभववाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुरज पाटील आणि हवालदार मारुती साखरे या दोघांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
Web Title: file a case of rape and demanding bribe, police sub-inspector and constable in ACB cage
See Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App