Home पुणे राज्यात अजून किती दिवस पावसाची विश्रांती, हवामान विभागाकडून महत्वाची माहिती

राज्यात अजून किती दिवस पावसाची विश्रांती, हवामान विभागाकडून महत्वाची माहिती

Weather forecast:  पुढच्या ४,५ दिवसात राज्यात कुठलेही तीव्र हवामानाचे इशारे नाहीत. राज्यात येत्या 4,5 दिवस हलका ते मध्यम पाउस (Rain) असेल.

Light to moderate rain in the state for the next 4-5 days

पुणे: राज्यात जुलै महिन्यात काही भागांत धो धो पाउस पडला तर काही ठिकाणी पुरेसा पाऊस पडलेला नाही. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने अनेक भागांत विश्रांती घेतली आहे. यापूर्वी जुलै महिन्यात कोकण आणि विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे हाहाकार माजला होता. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचा जोर कमी होऊ लागला. गेल्या चार, पाच दिवसांपासून पावसाने राज्यातील अनेक भागांत दडी मारली आहे.

सोमवारी राज्यातील कोणत्याही जिल्ह्यास हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला नाही. परंतु विदर्भातील काही भागात यलो अलर्ट दिला आहे. आगामी चार दिवस राज्यात पाऊस कसा असणार आहे, याचा अंदाजही हवामान विभागाने जारी केला आहे.

पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी ट्विट करत १० ऑगस्टपर्यंतचा पावसाचा अंदाज दिला आहे. राज्यात १० ऑगस्टपर्यंत कुठलेही तीव्र हवामानाचे इशारे दिले नाहीत. तसेच येत्या 4, 5 दिवस हलका ते मध्यम पाऊस असणार आहे.

दरम्यान सोमवारी वर्धा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांत यलो अलर्ट दिला आहे. इतर कोणत्याही जिल्ह्यात पावसाचा अलर्ट दिला गेला नाही.

Web Title: Light to moderate rain in the state for the next 4-5 days

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here