Home अहिल्यानगर अहिल्यानगर: तू माझ्यासोबत आली नाहीस तर…..विवाहितेशी असभ्य वर्तन

अहिल्यानगर: तू माझ्यासोबत आली नाहीस तर…..विवाहितेशी असभ्य वर्तन

Breaking News | Ahilyanagar Crime: दारुच्या नशेत असलेल्या एकाने त्याच्या ३२ वर्षीय विवाहित मैत्रीणीशी असभ्य वर्तन केल्याची घटना.

If you don't come with me....marital indecency

राहुरी: दारुच्या नशेत असलेल्या एकाने त्याच्या ३२ वर्षीय विवाहित मैत्रीणीशी असभ्य वर्तन केल्याची घटना राहुरी तालुक्यात घडली आहे.

एका ३२ वर्षीय विवाहित तरुणीचे संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील अक्षय कैलास आहेर याच्यासोबत मैत्रीचे संबंध होते. दोघांचे फोटो व व्हिडिओ अक्षय आहेर याच्या मोबाईलमध्ये आहेत. १६ जून रोजी सदर तरुणी राहुरी तालुक्यातील तिच्या नातेवाईकांकडे आली होती. १७ जून रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास सदर तरुणी तिच्या नातेवाईकांच्या शेतात घास कापत होती. त्यावेळी तिचा मित्र अक्षय दारू पिऊन तेथे आला. त्याने तरुणीशी

असभ्य वर्तन केले. त्यानंतर तू माझ्यासोबत आली नाहीस तर मी तुला, तुझ्या नवऱ्याला आणि मुलांना जीवंत मारून टाकीन, अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. माझ्याकडे आपल्या दोघांचे फोटो आहेत. मी व्हायरल करेल, अशी धमकी दिली.

घटनेनंतर तरुणीने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून आरोपी अक्षय कैलास आहेर याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ३५१ (२), ३५२ प्रमाणे विनयभंग व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार हनुमत आव्हाड करीत आहेत.

Breaking News: If you don’t come with me….marital indecency

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here