Home महाराष्ट्र पतीने पत्नीचे अश्लील फोटो केले व्हायरल, स्टेट्स ठेवल्याने पतीवर गुन्हा दाखल

पतीने पत्नीचे अश्लील फोटो केले व्हायरल, स्टेट्स ठेवल्याने पतीवर गुन्हा दाखल

Husband made obscene photos of wife viral

केज: पतीने पत्नीचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो तिच्या चुलत्याला पाठविले. व स्वतः च्या व्हाटस स्टेट्स ठेवल्याचा प्रकार समोर आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून केज पोलिसांत पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केज तालुक्यातील माहेरी असलेल्या २२ वर्षीय तरुणीस उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात विवाह लावून दिलेले आहे. ती सासरी नांदत असताना महिलेच्या पतीने अश्लील फोटो काढले होते. आता या दोघा पती पत्नीत वाद असल्यामुळे ही विवाहित महिला माहेरी केज येथे राहते.

सासरी राहत असताना पतीने अश्लील फोटो काढले होते. २४ डिसेंबर रोजी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास पतीने हे फोटो चुलत्याच्या मोबाईलवर पाठविले.

तसेच दुसऱ्या दिवशी २५ डिसेंबरला सकाळी ११ वाजता त्याने हे प[फोटो स्वतःच्या व्हाटस स्टेट्सला ठेवले होते. हा प्रकार या पिडीत महिलेच्या लक्षात येताच तिने पतीविरोधात केज पोलिसांत सायबर अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.  

Web Title: Husband made obscene photos of wife viral

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here