Home अहिल्यानगर अहिल्यानगर: पतीने डोक्यात दगड घालून पत्नीची केली हत्या

अहिल्यानगर: पतीने डोक्यात दगड घालून पत्नीची केली हत्या

Breaking News | Ahilyanagar Murder: दारू पिण्यास विरोध केल्याने पतीने डोक्यात दगड घालून 60 वर्षीय पत्नीची हत्या.

Husband kills wife by throwing stone at her head

पारनेर: दारू पिण्यास विरोध केल्याने पतीने डोक्यात दगड घालून 60 वर्षीय पत्नीची हत्या केली. पारनेर तालुक्यातील वनकुटे येथील तुकाईमाता मंदिर टेकडीजवळ ही घटना घडली. शनिवारी (दि.5) दुपारी दोन वाजता ही घटना उघडकीस आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, सावित्रा बबन देशमुख (वय 62) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर मृत महिलेची मुलगी प्रियंका अशोक बिलबिले (वय 35, रा. पळशी, ता. पारनेर) यांनी पारनेर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी बबन पाराजी देशमुख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बबन आणि त्याची पत्नी सावित्रा हे संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथून मोलमजुरीसाठी वनकुटे येथे आले होते. बबन याला दारूचे व्यसन आहे. सावित्रा त्याला दारू पिण्यास विरोध करत होती. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. यावेळी दोघांनीही एकमेकांना दगडाने मारहाण केली. यात सावित्रा हिचा मृत्यू झाला. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Husband kills wife by throwing stone at her head

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here