Home अहमदनगर अहमदनगर: डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत, पती ठार तर पत्नी जखमी

अहमदनगर: डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत, पती ठार तर पत्नी जखमी

Breaking News | Ahmednagar: खडी वाहणार्‍या विना क्रमांकाच्या चारचाकी डंपरने एका दुचाकीला दिलेल्या धडकेत पती ठार तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना.

Husband killed, wife injured in dumper collision with two-wheeler

पाथर्डी: खडी वाहणार्‍या विना क्रमांकाच्या चारचाकी डंपरने एका दुचाकीला दिलेल्या धडकेत पती ठार तर पत्नी गंभीर जखमी  झाले आहे. ही घटना पाथर्डी-नगर रोडवर असलेल्या हॉटेल प्रशांत समोर गुरूवार (दि. 11) रोजी घडली असून या घटनेत नितीन संजय पवार (वय 27 रा.वाघोली ता.शेवगाव) या तरुणाचा मृत्यू झाला. तर त्याची पत्नी रेणुका पवार (वय 24) ही गंभीर जखमी झाली असून तिला पुढील उपचारासाठी नगरला हलवण्यात आले आहे.

पवार दाम्पंत्य हे आपल्या दुचाकीवरून पाथर्डीकडून नगर रोडने जात असतांना समोरून आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. यात नितीन पवार यांचा जागीच मृत्यू झाला तर रेणुका पवार या गंभीर जखमी झाल्या. अपघात झाल्यानंतर वाहन सुद्धा रस्त्याच्या बाजूला पलटी झाले. ज्या ठिकाणी हा अपघात झाला तो रस्ता अत्यंत वर्दळीचा असल्याने घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली होती. नागरिकांनी जखमींना पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते. मात्र उपचारापूर्वीच नितीन पवार हे मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनेनंतर चारचाकी वाहनाचा चालक पसार झाला आहे.

Web Title: Husband killed, wife injured in dumper collision with two-wheeler

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here