Home नागपूर चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केली पत्नीची हत्या

चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केली पत्नीची हत्या

Breaking News | Nagpur Crime: चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच आपल्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना.

husband killed his wife due to suspicion of her character

नागपूर: नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे,  चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच आपल्या पत्नीची हत्या केली. दिल्पिस सिंग उर्फ विकी कुलंदर सिंह विक्र असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे तर मन्नत कौर दिल्पिस सिंग विक्र असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. नागपूरच्या कपिलनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  नागपूरच्या कपिल नगर पोलीस स्टेशन हद्दीत काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच आपल्या पत्नीचीची हत्या केली आहे. आरोपी दिल्पिस सिंग उर्फ विकी कुलंदर सिंह विक्र याने आपली पत्नी मन्नत कौर दिल्पिस सिंग विक्र हिच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करून तिची हत्या केली आहे.

आरोपी व मृत महिला यांचा 2022 मध्ये प्रेमविवाह झाला होता, मात्र काही दिवसांपासून दोघात वाद होत होता. 25 जूनच्या रात्री हा वाद एवढा विकोपाला गेला की आरोपी दिल्पीस सिंगने मन्नत वर लोखंडी रॉडने वार करुन तिची हत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, घटनेबाबत पुढील तपास सुरू आहे.

Web Title: husband killed his wife due to suspicion of her character

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here