Home नाशिक पत्नीसोबत वाद! पतीने उड्डाणपुलावरून उडी घेत आयुष्य संपवले

पत्नीसोबत वाद! पतीने उड्डाणपुलावरून उडी घेत आयुष्य संपवले

Nashik Suicide Case: पत्नीसोबत झालेल्या वादातून नवऱ्याने टोकाची भूमिका घेतली. त्याने उड्डाणपुलावरून उडी घेत आयुष्य संपवले.

husband ended his life by jumping from the flyover

नाशिक: संसार म्हटल्यावर भांड्याला भांड लागणारच. नवरा-बायकोमध्ये वाद होत राहतात. पण हा वाद कधी टोकाला जाईल, हे सांगता येत नाही. नाशिकमध्ये नवरा बायकोच्या वादाची धक्कादायक घटना घडली आहे. बायकोसोबत वाद झाल्यामुळे नवऱ्याने आयुष्याचा दोर कापलाय. रिक्षामध्ये जात असताना पत्नीसोबत झालेल्या वादातून नवऱ्याने टोकाची भूमिका घेतली. त्याने उड्डाणपुलावरून उडी घेत आयुष्य संपवले. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.

पत्नीसोबत रिक्षात प्रवास करणाऱ्या तरुणाने चालत्या रिक्षातून पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी संध्याकाळी घडली. तपोवन परिसरातील कन्नमार पुलावर त्या तरूणाने उडी घेत आयुष्य संपवले. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव चेतक पवार असे आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली.

चेतक पवारने बायकोसोबत झालेल्या वादातून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर सांगितले. चेतकच्या आत्महत्यानंतर त्याची पत्नी देखील उड्डाण पुलावरून खाली आली आणि रडायला लागली. घटना घडल्यानंतर येणारे जाणारे वाहांचालकाने गर्दी केली होती. ज्या रिक्षात बसून चेतक पत्नी सोबत प्रवास करत होता त्याच रिक्षातून जखमी चेतकला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासानंतर मृत घोषीत केलं. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. चेतकने आत्महत्या का केली याचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Web Title: husband ended his life by jumping from the flyover

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here