चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या
Breaking News | jalgaon Suicide: चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीला गळफास देवून तिचा खून केल्यानतंर पतीनेही भितीपोटी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना.
जळगाव: तालुक्यातील हातगाव येथे चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीला गळफास देवून तिचा खून केल्यानतंर पतीनेही भितीपोटी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज (दि.०२) रोजी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वर्षा विजय चव्हाणके (३८) आणि विजय चव्हाणके(४५) असे मयतांची नावे आहेत. या घटनेमुळे हातगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
विजय हा मुले तसेच आईसह हातगाव शिवारात शेतात राहत होता. त्याचे गेल्या काही दिवसांपासून पत्नीशी वाद होत होता. २ रोजी सकाळी ११:२५ वाजेच्या सुमारास विजय याने मोठा भाऊ अशोक चव्हाणके यांना फोन करून आपण पत्नी वर्षाला संपविले असून, स्वतः सुद्धा बरेवाईट करणार असल्याचे सांगितले.
अशोक चव्हाणके यांनी कुटुंबासह भाऊ विजय व त्याची पत्नी वर्षा यांच्या शोधासाठी शेतात धाव घेतली. त्यावेळी शेतातील आंब्याच्या झाडाला विजय हा गळफास घेतलेल्या अवस्थेत तर वर्षा ही शेतातील गुरांच्या चाऱ्यामध्ये मृतावस्थेत आढळून आली. तिच्या गळ्याभोवती सुती दोरी गुंडाळलेली होती. लहान भाऊ विजय चव्हाणके याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून केला व स्वतः आत्महत्या केली, अशी फिर्याद अशोक चव्हाणके यांनी दिली. त्यावरुन विजयच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Breaking News: Husband commits suicide after killing wife over suspicion of character