अनैतिक संबधाच्या संशयातून पतीकडून पत्नीला जबर मारहाण
नेवासा: आपल्या पत्नीचे गावातील एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीकडून पत्नीला मारहाण (Beats) झाल्याची घटना नेवासा तालुक्यातील सोनई येथे घडली. याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोनई येथे रहिवासी बाळासाहेब त्रिंबक जंजाळ हा त्याची पत्नीवर गेल्या काही दिवसांपासून संशय घेत असून यावरून तिला मारहाण करत होता.
आपल्या पत्नीची माहेरच्या गावातील एका इसमासोबत अनैतिक संबंध असल्या कारणावरून बाळासाहेब जंजाळ हा दारूच्या नशेत त्याची पत्नीला करत होता. याच कारणावरून आरोपी बाळासाहेब जंजाळने पत्नीला लाकडी दांडक्याने जोरदार मारहाण करत तिला गंभीर जखमी केले. आणि तो घटनास्थावरून फरार झाला आहे.
या घटनेबाबत पत्नीची बहिण सौ. लता अशोक कापसे यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब जंजाळ हा आरोपी फरार असून पोलीस कसून शोध घेत आहे.
Web Title: Husband beats wife over suspicion of immoral relationship