संगमनेर: विवाहितेचा गर्भपातासाठी छळ पतीस अटक
Breaking News | Sangamner: मुल नको असल्याने गर्भवती पत्नीला बळजबरीने गोळ्या खायला घालून तिचा गर्भ पाडण्याचे अघोरी कृत्य सासू- सासरा पसार.
संगमनेर: मुल नको असल्याने गर्भवती पत्नीला बळजबरीने गोळ्या खायला घालून तिचा गर्भ पाडण्याचे अघोरी कृत्य पतीसह सासू सासऱ्यांने केले. तालुक्यातील दरेवाडी येथे हा अमानुष प्रकार उघड झाल्याने संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, पोलिसांनी पीडित विवाहितेच्या फिर्यादीवरून पतीसह सासू- सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शुभम साहेबराव हुलवळे (रा. दरेवाडी, ता. संगमनेर) याला पालिसांनी अटक केली आहे, मात्र सासू अर्चना व सासरा साहेबराव हुलवळे हे दोघे पती- पत्नी पसार झाले आहेत.
या प्रकरणी अश्विनी शुभम हुलवळे (२२) यांनी पोलिसात फिर्याद दिली. पीडित विवाहितेला तीन वर्षाचा मुलगा आहे. ती पुन्हा गरोदर असताना, ‘आपल्याला मुल नको,’ असे म्हणत तिच्या पतीने पत्नीचा नकार असताना तिला जबर मारहाण केली. पोटातील गर्भ काढण्यासाठी तिला सासू सासरा व पतीने मारहाण करुन, बळजबरीने तिच्या तोंडात गोळ्या टाकल्या.
गोळ्या खाल्ल्यानंतर तिला रात्री पोटात त्रास होऊ लागला. म्हणून तिला साकुर येथे एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. दोन दिवस उपचार करण्यात आले, परंतू प्रकृतीत सुधारणा न झाल्याने संगमनेर येथे मोठ्या दवाखान्यात जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी नणंद सोनाली गुळवे व पती शुभम यांनी विवाहितेला पुन्हा संगमनेर येथील एका खासगी दवाखान्यात दाखल नेले. सोनोग्राफी करुन, इंजेक्शन व गोळ्यादिल्यानंतर सायंकाळी तिला घरी आणले, मात्र तिला पुन्हा रक्तस्त्राव सुरू झाला. यामुळे सुमारे १० दिवस तिच्यावर उपचार करण्यात आले. अशा बिकट परिस्थितीत सासू-सासऱ्यासह पतीने तिला लाथा- बुक्क्यांनी अमानुष मारहाण केली.
या अघोरी कृत्यामुळे पिडिने थेट घारगाव पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनी तिला पुढील उपचारासाठी प्रवरा हॉस्पिटल येथे ठिकाणी पाठविले. उपचारानंतर पिडितेला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. या नंतर घारगाव पोलिस ठाण्यात तिने फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर शुभम याला अटक करण्यात आली, मात्र सासू-सासरे पसार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
Web Title: Husband arrested for harassing married woman for abortion
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study