नातेवाईकांसह बोलण्यासाठी गाडी बाजूला घेतली…पती पत्नीला ट्रकने चिरडले
भरधाव ट्रकने दुचाकीस्वार पती- पत्नीला चिरडल्याचा (Accident) धक्कादायक प्रकार.
भंडारा: भरधाव ट्रकने दुचाकीस्वार पती- पत्नीला चिरडल्याचा धक्कादायक प्रकार भंडाऱ्यात समोर आला आहे. अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून आणखी एक महिला गंभीर जखमी झाली आहे. रस्त्याने विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रकने दुचाकीस्वार पती- पत्नीला चिरडले. तुमसर-मोहाडी राज्य मार्गावरील खरबी येथे ही घटना घडली आहे. या अपघाताचे थरारक दृश्य सिसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तुमसर- मोहाडी राज्य मार्गावर खरबी येथे दुचाकीस्वार पती -पत्नी रस्त्याच्या बाजुला नातेवाईकांसोबत बोलत उभे होते. यावेळी विरुध्द दिशेने येणाऱ्या डब्लुसीएल कंपनीचा कोळसा भरलेल्या भरधाव ट्रकने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार पती -पत्नीचा जागीच मृत्यू झाला. बालचंद ठोंबरे (वय ५५) व वनिता ठोंबरे (वय ५०) असे ट्रकच्या धडकेत ठार झालेल्या पती पत्नीचे नाव आहे.
या अपघातात अन्य एक महीला गंभीर झाल्याची थरारक घटना घडली. नलु दामोधर बडवाईक (वय ४०, रा. खरबी) असे जखमी असलेल्या महीलेचे नाव आहे. ही घटना सिसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तुमसर-मोहाडी राज्यमार्गवरील खरबी येथे जि प शाळेसमोर ही घटना घडली आहे. मोहाडी पोलिसात अपघाताची नोंद करत पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे.
Web Title: Husband and wife were crushed by a truck Accident
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App