Home संगमनेर Accident | संगमनेर: कारची दुचाकीला जोराची धडक, पती पत्नी गंभीर

Accident | संगमनेर: कारची दुचाकीला जोराची धडक, पती पत्नी गंभीर

Husband and wife seriously injured in car collision Accident

Sangamner | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील साकुर येथील बिरोबा महाराजांचे देवदर्शन करून पती पत्नी दुचाकीवरून घरी परतत असताना मागून येणाऱ्या कारने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. हा अपघात (Accident)नाशिक पुणे महामार्गावर १९ मैल परिसरात रविवारी दिनांक ८ मे रोजी सव्वा चार वाजेच्या सुमारास घडला.

या अपघातात कार उलटल्याने दर्शनी भागाचा पुरता चक्काचूर झाला व दुचाकीचेही मोठे नुकसान झाले. प्रमोद दशरथ आरोटे व दिपाली प्रमोद आरोटे दोघेही रा. डूम्बरवाडी ता. जुन्नर जि. पुणे अशी जखमी झालेल्या पती पत्नीची नावे आहेत.  प्रमोद आरोटे व दिपाली हे दाम्पत्य दुचाकी वरून तालुक्यातील साकुर येथील बिरोबा महाराजांच्या दर्शनासाठी गेले होते. ते दर्शन घेऊन आळे फाट्याच्या दिशेने घरी परतत असताना नाशिक पुणे महामार्गावर १९ मैल येथे आले असता त्याच दरम्यान पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने क्रमांक एमएच १५. सीडी ५११४ दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दोघे पती पत्नी गंभीर जखमी झाले. आजूबाजूच्या नागरिकांनी अपघातातील दोघे पती पत्नी जखमींना आळे फाटा येथे खासगी रुग्णालयात दाखल केले.

Web Title: Husband and wife seriously injured in car collision Accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here