HSC Exam cancelled: मोठी बातमी अखेर बारावीची परीक्षा रद्द
HSC Exam cancelled: अखेर बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. राज्य शासन विभागाने पाठविलेला प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्वीकारला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र बोर्डाच्या १२ वी च्या परीक्षा अधिकृतरीत्या रद्द झाल्या आहेत.
शालेय शिक्षणमंत्री यांनी काल १२ वी च्या परीक्षा रद्द करण्याचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठविल्याचे सांगितले होते. तसेच मंत्रिमंडळ बैठकीत परीक्षा रद्द करण्याच्या अनुषंगाने चर्चा झाली होती. आता १२ वीच्या विद्यार्थ्यांचे मुल्यांकन कसे केले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Web Title: HSC Exam cancelled