संगमनेर: भरदुपारी घर फोडले; दोन सोने लंपास
- Breaking News | Sangamner: संगमनेर तालुक्यातील बोरबन येथील एका घरात बुधवार, ६ ऑगस्ट रोजी दिवसाढवळ्या चोरी झाली.
- अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने चोरून नेले.
- पीडित शेतकरी कैलास काशिनाथ गाडगे यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
- चोरीला गेलेल्या वस्तूंमध्ये दोन तोळे सोन्याचे दागिने, १२ सोन्याचे मणी आणि एक नाकातील अंगठी यांचा समावेश आहे.
संगमनेर : भरदुपारी बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना बुधवारी (दि.६) दुपारी दोनच्या सुमारास संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोरबन येथे घडली.
याप्रकरणी घारगाव पोलिस ठाण्यात कैलास काशिनाथ गडगे (रा. बोरबन, ता. संगमनेर) या शेतकऱ्याने घारगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बुधवारी दुपारच्या वेळी कैलास गडगे व त्यांची पत्नी कामानिमित्त घारगाव येथे गेले होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील डबे व इतर वस्तूंची उचकापाचक करून बॅगेत ठेवलेले दोन तोळे सोन्याचे दागिने, १२ सोन्याचे मनी, एक नथनीसह मुद्देमाल लंपास केला.
Breaking News: House broken into in broad daylight; two gold coins stolen