रूग्णालयातील कर्मचारी तरुणीचा विनयभंग
Breaking News| Pune Crime: ज्येष्ठाकडून रूग्णालयातील कर्मचारी तरुणीचा विनयभंग.
पुणे: ज्येष्ठाकडून रूग्णालयातील कर्मचारी तरुणीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी एका ज्येष्ठाविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबत एका २७ वर्षाच्या तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी एका ७३ वर्षाच्या ज्येष्ठाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तक्रारदार तरुणी मध्यभागातील एका खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट आहे. ३ जुलै रोजी सायंकाळी सात वाजता ज्येष्ठ रुग्णालयात आला होता. त्या वेळी तरुणी एकटीच रुग्णालयात होती. तरुणी एकटी असल्याची संधी साधून ज्येष्ठाने तिच्याशी अश्लील वर्तन केले. फिर्यादी हिने विरोध केला. तेव्हा त्याने ‘‘खिशाला हात लावून माझ्याकडे खुप पैसे आहेत. मी तुला हॉटेलमध्ये नेतो, माझ्यासोबत जेवायला चल. मला पाहिजे ते तू माझेसोबत कर, तुला पाहिजे ते मी तुला देईन, ’’ असे बोलल्याने ही तरुणी घाबरली. ती क्लिनिकमधून बाहेर पळाली. त्यानंतर या ज्येष्ठ नागरिकाने तिला गाठले. ‘‘उद्या क्लिनिकमध्ये आहे का ?’’ अशी विचारणा केली. या घटनेनंतर घाबरलेल्या तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.
Breaking News: Hospital employee molests young woman