अहमदनगर जिल्ह्यात आणखी एक हनीट्रॅप, महिलेने लाखो उकळले
Ahmednagar | Shrigonda: हनीट्रॅपचे लोण ग्रामीण भागात देखील पसरताना दिसून येत आहे. श्रीगोंदा तालुक्यात देखील एक सरकारी बाबू या हनीट्रॅपचा (honeytrap) शिकार झाला आहे.
या अधिकाऱ्याकडून एका महिलेने लाखो रुपये उकळल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रकरण दडपण्याचे या अधिकाऱ्याने प्रयत्न केले मात्र तो अपयशी ठरला. लाखो रुपयेही गेले अन् प्रकरणाची चर्चा देखील झाल्याने त्याची बिकट अवस्था झाली आहे.
श्रीगोंदा शहरातील एका महिलेची कामानिमित्त सरकारी कार्यालयात जात असताना तोंड ओळख होऊन पुढे त्या महिलेशी मैत्री झाली आणि प्रेम प्रकरण.सुरु झाले. या प्रेम प्रकरणात ती महिला आणि सरकारी अधिकारी यांच्या भेटी गाठी होऊन कधी एकत्र आले ते समजलेच नाही. काही दिवस उलटल्यानंतर त्या महिलेने अधिकाऱ्याला पैशाची मागणी केली केल्याने हे प्रकरण दोन लाख रुपयाला मिटले.
‘हनी ट्रॅप’मध्ये गुंतवून सरकारी बाबुला लुटल्याची घटना उघडकीस आल्याने श्रीगोंदा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
Web Title: honeytrap in Ahmednagar district, the woman boiled millions