4 महिन्यांवर लग्न, बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
Breaking News | Nashik: नाशिकमध्ये नायलॉन मांजाने एकाचा बळी घेतल्याची घटना घडली.
नाशिक: मकरसंक्रातीच्या पार्श्वभूमीवर मोठ्याप्रमाणात पतंगबाजी केली जाते. मात्र असे करत असताना प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या वापर नागरिकांच्या जिवावर उठला असल्याचे समोर आले आहे. अशातच नाशिकमध्ये नायलॉन मांजाने एकाचा बळी घेतल्याची घटना घडली आहे. नाशिकच्या पाथर्डी परिसरात ही घटना घडली आहे. दरम्यान जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी नेले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून घोषित केलंय. सोनू किसन धोत्रे असे नायलॉन मांजामुळे मृत्यू झालेल्या 23 वर्षीय युवकाचे नाव आहे.
समोर आलेली माहिती अशी की, गुजरातहुन मोटारसायकलवर घरी येत असताना वाटेतच या युवकावर काळाने घाला घातला अन् नायलॉन मांजामुळे त्याचा गळा कापल्या गेला. ही जखम इतकी जबर होती की उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान येत्या मे महिन्यात मृत सोनू धोत्रेचे लग्न होतं. अशातच तो गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी घरी जात असताना पाथर्डी येथे हा अपघात घडला असून आपल्या बहिणीची भेट अपूर्ण राहिली आहे.
Web Title: his bike to meet his sister, Naylaw was ambushed by Manja
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News