विवाह नोंदणी ओळखीतून एका उच्चशिक्षित महिलेवर लैंगिक अत्याचार
Breaking News | Pune Crime: विवाहविषयक नोंदणी संकेतस्थळावरुन झालेल्या ओळखीतून एका उच्चशिक्षित महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस.
पुणे : विवाहविषयक नोंदणी संकेतस्थळावरुन झालेल्या ओळखीतून एका उच्चशिक्षित महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने उच्चपदस्थ अधिकारी असल्याची बतावणी करुन महिलेची ३८ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध अत्याचार तसेच फसवणूक केल्याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ३७ वर्षीय महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पिडीतेने दिलेल्या फिर्यादीवरून, एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात महिलेने विवाह नोंदणी संकेतस्थळावर नोंदणी केली होती. आरोपीने महिलेशी संपर्क साधून विवाह करण्यास इच्छूक असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपीने महिलेची भेट घेतली. उच्चपदस्थ शासकीय अधिकारी असल्याची बतावणी त्याने महिलेकडे केली. त्यानंतर महिलेला जाळ्यात ओढून त्याने तिच्यावर अत्याचार केला. जमीन खरेदीत गुंतवणूक करायची असल्याचे सांगून त्याने महिलेकडून ३८ लाख रुपये घेतले. महिलेने त्याच्याकडे विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यनंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. सहायक पोलीस निरीक्षक कल्पना सुरवसे अधिक तपास करत आहेत.
Web Title: highly educated woman sexually assaulted through marriage registration identification
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News