उच्चशिक्षित तरुणीची मित्राला फोन करून आत्महत्या
Breaking News | Suicide Case: उच्चशिक्षित तरुणीने धक्कादायकरीत्या आयुष्य संपवले. मित्राला व्हिडीओ कॉल करून आत्महत्या.
छत्रपती संभाजीनगर: करिअरबाबत अपूर्ण राहिलेले स्वप्न, नाती, मित्र-मैत्रिणी, अशा सर्व बाबींची रोजनिशी लिहिणाऱ्या उच्चशिक्षित तरुणीने धक्कादायकरीत्या आयुष्य संपवले. मित्राला व्हिडीओ कॉल करून आत्महत्या करत असल्याचे सांगून गळफास घेतला. सिद्धार्थी संतोष हरदे (२३) असे तिचे नाव आहे. घाबरलेल्या मित्राने घरी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सिद्धार्थीने आयुष्य संपवले होते. सिद्धार्थी काही दिवसांपूर्वीच शहरात स्थायिक झाली होती.
महाविद्यालयापासून काही अंतरावर कांचनवाडीमध्ये भाड्याने खोली घेऊन ती एकटी राहत होती. दिवसभर महाविद्यालयात वेळ घालवून ती खोलीवर परतली. सोमवारी अचानक तिने एका मित्राला कॉल केला. बराच वेळ बोलल्यानंतर तिने आयुष्य संपवत असल्याचे त्याला सांगितले. मित्र समजूत घालण्याचा प्रयत्न करत असतानाच सिद्धार्थीने लटकवून घेतले.
पोलिसांना सिद्धार्थीच्या खोलीत डायरी आढळली. त्यात सिद्धार्थीने आयुष्याविषयी मजकूर लिहिलेला आढळला. स्पर्धा परीक्षेची तयारी, सरकारी अधिकारी होण्याच्या स्वप्नाविषयी लिहिले आहे. शिवाय एकटपेणा, आर्थिक परिस्थिती, तडजोड, अपूर्ण राहिलेले स्वप्न आदी मुद्द्यांवर तिने डायरीत लिहिले आहे.
Web Title: highly educated girl committed suicide by calling her friend
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study