‘तो कुरियवाला नाही तर बॉयफ्रेंड’ त्या दिवशी बिनसलं म्हणून… जबरदस्त ट्विस्ट
Breaking News | Crime News: पुण्यातल्या कोंढवा परिसरातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये झालेल्या घटनेत एक जबरदस्त ट्विस्ट आला आहे.
पुणे: पुण्यातल्या कोंढवा परिसरातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये घरात घुसून तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघड झाला होता. या प्रकारानं एकच खळबळ उडाली होती. या आरोपीनं एवढ्यावरच न थांबता घटनेनंतर तिच्याच मोबाईलमध्ये सेल्फी काढला आणि परत येईन असे टाईप करुन ठेवले होते. त्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या प्रकरणातल्या आरोपीला तब्बल 48 तासांनंतर शुक्रवारी (4 जुलै) अटक करण्यात आली. आरोपीच्या कबुली जबाबतून नवी माहिती मिळेल अशी शक्यता निर्माण झाली होती. पण, त्याचवेळी पीडित तरुणीनं दिलेल्या जबाबानं या संपूर्ण प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
या प्रकरणात सुरुवातीला उघड झालेल्या माहितीनुसार, आरोपीने कुरिअर बॉय असल्याचे सांगत सोसायटीमध्ये प्रवेश केला होता. पीडित महिलेने कुरिअर माझे नाही असे सांगितले, तरीही सही करावी लागेल असे आरोपीने सांगितले. त्यामुळे तरुणीने घराचा सेफ्टी दरवाजा उघडला. त्यानंतर आरोपीने तोडांवर पेपर स्प्रे मारला. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर मी परत येईन, असं सांगत तो पसार झाला.
कुरियरवाला नाही बॉयफ्रेंड
पीडित तरुणीनं पोलिसांना दिलेल्या जबानीतून नवी माहिती उघड झाली आहे. त्यानुसार पीडित मुलगी आणि आरोपी एका समाजाच्या कार्यक्रमात तीन ते चार वेळा भेटले होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यात मैत्री होती. हे दोघं अनेकदा भेटले होते. अगदी मुलीच्या घरीही ते बऱ्याचवेळा भेटले होते. ही बलात्काराची घटना घडली त्या बुधवारी देखील त्यांचं भेटायचं ठरलं होतं.
त्या दिवशी तरुणी शरीर संबंधाला तयार नव्हती. पण, आरोपीनं तिच्यावर जबरस्ती केली. दोघांमध्ये अर्धवट शरीरसंबंध झाले. तो तरुण सेल्फी काढून निघून गेला. त्यानंतर संतापलेल्या तरुणीनं तिच्यावर अत्याचार झाल्याची तक्रार केली. या प्रकरणातील आरोपी हा कुरियर बॉय नाही. तो उच्च शिक्षित असून एका बड्या कंपनीमध्ये नोकरी करत आहे. तरुणी आणि आरोपीच्या घरचेही एकमेकांना ओळखत होते, अशी माहिती देखील उघड झाली आहे.
पीडित मुलीनं सुरुवातीच्या जबाबात खोटी माहिती दिल्याची कबुली दिली आहे. आरोपी आणि तरुणी एकाच समाजाचे असल्यानं ते एकमेकांना ओळखत होते. त्यानं तिला आजवर घरी अनेक पार्सल पाठवले होते. हे पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. हे दोघं तरुणीच्या घरी कुणी नसताना तिच्या घरी भेटत असंत. तसंच तो मुलीच्या घरच्यांना कळू नये म्हणून नेहमी कुरियर बॉय म्हणून येत असे, अशी कबुली पीडित तरुणीनं दिली आहे.
Breaking News: He’s not a prostitute, he’s a boyfriend’ because he was unmarried that day