अनैतिक संबधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने कायमचा काढला काटा
Buldhana Crime | बुलढाणा: अनैतिक संबधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने कायमचा काटा काढल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील वझर येथे ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वझर येथील रामदास सरकटे याचा मृतदेह (Dead body) भूमराळा शिवारात एका विहिरीत शुक्रवारी आढळून आल्याने सरकटे यांचा खून (Murder) झाल्याचा पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी तपास करीत प्रकरणाचा उलगडा केला आहे. या प्रकरणी तिघांना अटक केली आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी तपास करताना सरकटे याच्या पत्नीला व त्यांच्या अल्पवयीन बालकास पोलिसी खाक्या दाखविला. त्यानंतर दोघेही घडघडा बोलू लागले. पोलिसांच्या तपासात तपासात मयत रामदास यांच्या पत्नीचे गावातीलच ज्ञानेश्वर आघाव यांचेशी अनैतिक संबंध होते. त्यावरुन सरकटे आणि पत्नीचे नेहमी भांडण होत असतं.
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा कायमचा काटा काढून टाकायचे असे ज्ञानेश्वर आघाव व संगीत सरकटे यांनी ठरवलं. दोघांनी मिळून रामदास सरकटे याचा आधी दोरीच्या साहाय्याने गळा आवळून खून केला. त्याचा मृतदहे विहिरीत फेकून दिला. या प्रकरणी ज्ञानेश्वर आघाव, संगीता सरकटे व अल्पवयीन मुलास अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Web Title: help of her lover, her husband, who was an obstacle in an immoral relationship murder