Rain Alert: पुढील ४८ तासांत राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस
Breaking News | Rain Alert: २५ व २६ फेब्रुवारी या कालावधीत विदर्भातील अकोला आणि बुलढाणा हे दोन्ही जिल्हे वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज.
Weather Forecast: वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे देशातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. तापमानाचा पारा वाढल्याने थंडी गायब झाली असून डोंगराळ भागात बर्फवृष्टी होत आहे. मैदानी भागात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने काही भागात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. दरम्यान, पुढील ४८ तासांत महाराष्ट्रासह अनेक राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार, २५ व २६ फेब्रुवारी या कालावधीत विदर्भातील अकोला आणि बुलढाणा हे दोन्ही जिल्हे वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई तसेच पुण्यात कोरडं हवामान राहणार असून राज्यात कोकण वगळता काही भागात तुरळक पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते, मिळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत.
Web Title: Heavy rain with gale force in the state in next 48 hours
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study