Home अकोले रिमझिम पावसाने धरला जोर, वाकी तलाव ओव्हरफ्लो

रिमझिम पावसाने धरला जोर, वाकी तलाव ओव्हरफ्लो

Breaking News | Akole: पावसाच्या सरींनी धरलाय जोर : कृष्णावंती वाहू लागली, १९७ क्युसेकने पाणी नदीपात्रात. आता निळवंडे धरणातील पाणीसाठ्यातही वाढ होणार आहे.

Heavy rain, Waki ​​Lake overflowed

राजूर : कळसुबाई शिखराच्या पर्वतरांगांत पावसाच्या सरी बरसत असल्यामुळे कृष्णावंती नदी आता भरून वाहत आहे. वाकी येथील लघु पाटबंधारे तलाव शुक्रवारी सकाळी सहा वाजता ओव्हरफ्लो झाला. या तलावाच्या भिंतीवरून १९७ क्युसेकने पाणी नदीपात्रात पडत आहे.

जून महिना सरता सरता भंडारदरा पाणलोट क्षेत्राबरोबर कळसुबाई शिखराच्या पर्वतरांगांतही पावसाच्या सरी जोर धरू लागल्या. यामुळे प्रवरेची उपनदी म्हणून ओळख असणारी कृष्णावंती नदी वाहू लागली आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून पावसाचे सातत्य टिकून नसले तरी येणाऱ्या सरी जोरदार बरसत आहेत. त्यामुळे डोंगररांगांवरून पाणी वाहू लागले आहे. कृष्णावंती नदीवर वाकी येथे बांधण्यात आलेला ११२ दशलक्ष घनफूट क्षमतेचा लघु पाटबंधारे तलाव शुक्रवारी सकाळी ओव्हरफ्लो झाला. तलावाच्या भिंतीवरून १९७ क्युसेकने पाणी नदीपात्रात झेपावत असल्याचे अभियंता अभिजीत देशमुख यांनी दिली. झेपावत असलेले हे पाणी पुढे निळवंडे धरणात येणार असल्यामुळे आता निळवंडे धरणातील पाणीसाठ्यातही वाढ होणार आहे. अकोले तालुक्यातील आंबित येथील लघु पाटबंधारे तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर वाकी येथील हा दुसरा पाटबंधारे तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. भंडारदरा धरणात चोवीस तासांत १४९ दलघफू नवीन पाण्याची आवक होत पाणीसाठा दोन हजार दलघफूटांहून अधिक म्हणजेच २ हजार ८ दलघफू झाला होता.

Web Title: Heavy rain, Waki ​​Lake overflowed

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here