सिन्नर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाउस, दुकानदारांचे लाखोंचे नुकसान
Sinnar Rain News: सिन्नर शहर व तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाउस झाल्याने मोठे नुकसान.
सिन्नर: नाशिक जिल्ह्यात बुधवारी व गुरुवारी रात्री मुसळधार पाऊस झाल्याने गोदावरी नदीचे पात्र दुथडी भरून वाहू लागले आहे. सिन्नर शहर व तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाउस झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शहरात दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
सिन्नर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतात पुराचं पाणी शिरल्याने उभ्या पिकांचं पूर्णपणे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिकांसह शेत जमीन वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. काही ठिकाणी बंधारे तुडुंब भरल्याने बंधाऱ्याचे पाणी शेतात शिरलं आहे. शासनाने आम्हांला मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
नाशिकच्या सिन्नर तालुक्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर, नदीकाठच्या अनेक वाड्या-वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने मोठं नुकसान झालं आहे. यात काही नागरिक बेपत्ता असल्याचीही माहिती समोर येत आहे.
रात्रीपासूनच घटनास्थळावर मदतकार्य करण्यासाठी शासकीय यंत्रणा दाखल झाल्या आहेत. सध्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये जेसीबीच्या सहाय्याने नागरिकांचं रेस्क्यू केल्याचं पाहायला मिळतं. यात अनेक नागरिक जेसीबीवर बसलेले पाहायला मिळतात. नागरिकांना घेऊन हा जेसीबी पुराच्या पाण्यातून बाहेर पडताना दिसत आहे. जेसीबी वर बसवून 33 नागरिकांची सुटका करण्यात आलेली आहे.
पावसामुळे आलेल्या पूरामुळं सिन्नर शहरातील दुकानांमध्ये पाणी शिरलं. त्यामुळे व्यावसायिक हतबल झाले. एका स्टेशनरी दुकानदरानं दुकानामधील सर्व वह्या, पुस्तके तसेच कागद भिजले असं सांगितलं. संबंधित दुकानदाराने पाच लाख रुपयांचे नुकासन झाल्याचे सांगितलं. अन्य एका दुकानदारानं दुकानात पाणी शिरल्यानं 99 टक्के माल भिजल्यानं हजारो रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद केले.
Web Title: Heavy rain in Sinnar taluka, loss of lakhs to shopkeepers