नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस, जायकवाडी धरणात चार दिवसांत इतकी वाढ
Jayakwadi Dam: जायकवाडी धरणात देखील पाण्याची आवक वाढली.
छत्रपती संभाजीनगर: आठवड्याभरापासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणात सतत पाण्याची वाढ होतांना दिसत आहे. नाशिक येथील महत्वाची धरणं भरल्याने या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात देखील पाण्याची आवक वाढली होती. मागील चार दिवसांत जायकवाडी धरणात 6 टक्के पाण्याची वाढ झाली आहे. जायकवाडीत सध्या 39.8 टक्के पाणीसाठा असून, 10 हजार 125 क्युसेकने आवक सुरु आहे. तर, धरणात एकूण 1586.482 दलघमी पाणीसाठा असून, 848.376 दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदा धरण भरण्याची शक्यता कमीच असल्याचे बोलले जात आहे.
मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात देखील मोठी घट झाली होती. मात्र, मागील चार-पाच दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत देखील वाढ होतांना पाहायला मिळत आहे. मागील चार दिवसांत जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात 6 टक्के पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे धरणाचा पाणीसाठा 39.8 टक्के झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन्ही शहराला पिण्यासाठी जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सोबतच छत्रपती संभाजीनगरच्या पैठण एमआयडीसी, वाळूज, बिडकीन, चिखलठाणा एमआयडीसी मधील उद्योगांना देखील जायकवाडी धरणातूनच पाणीपुरवठा केला जातो. जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात घट झाल्यास याचे परिणाम थेट या दोन्ही जिल्ह्यांच्या पिण्याच्या आणि उद्योगासाठी लागणाऱ्या पाण्यावर होत असते. मात्र, चार-पाच दिवसांत झालेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक सुरु झाली. पाणीसाठा आता 39.8 टक्के झाला आहे. ज्यामुळे आता पिण्याच्या पाण्यासह उद्योगांची वर्षभराची चिंता मिटली आहे.
Web Title: Heavy rain in Nashik district, increase in Jayakwadi dam
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App