नगरमध्ये मुसळधार पाऊस, जेसीबीच्या साह्याने लोकांना बाहेर काढले
Breaking News | Ahmednagar: मुसळधार पाऊस, नदी, ओढ्यांनी रौद्र रूप धारण.
अहमदनगर: नगर जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी शनिवारी पहाटे मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे साकत परिसरातील नदी, ओढ्यांनी रौद्र रूप धारण केले होते. यामुळे अनेक वाड्या व वस्त्यांचा संपर्क तुटला होता. तसेच शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. साकत कोल्हेवाडी कडभनवाडी जोडणारा लेंडी नदीवर असलेला पुल आज झालेल्या अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेला यामुळे लोकांचा संपर्क तुटला होता. सकाळी आठ वाजता काही लोकांना जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. तसेच अनेक विद्यार्थ्यांना परत माघारी जावे लागले.
परिसरात जून महिन्यांपासून पाऊस आहे. पेरणी जून मध्ये पेरणी झाली पण जूनपासून रोजच पाऊस आहे. फक्त आठ दिवस पावसाने खंड दिला. परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला यामुळे लेंडी नदीला पूर आल्यामुळे संपर्क तुटला होता. सकाळी पाणी थोडे कमी झाल्याने जेसीबीच्या साहाय्याने लोकांना पाण्याच्या पलीकडे सोडले यात अनेक दुधवाले व विद्यार्थी होते.
साकत कोल्हेवाडी मार्गावर साकत जवळ पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच वराट वस्ती, कडभनवाडी या ठिकाणचा संपर्क तुटला आहे. लेंडी नदी व वांजरा नदीला पुर आल्यामुळे अनेक ठिकाणचा संपर्क तुटला होता.
आज परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला यामुळे नदीला पूर आला होता यातच साकत जवळील लेंडी नदीवर पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. शालेय विद्यार्थी व नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. पुलाची उंची वाढवावी अशी मागणी होत आहे.
आज पहाटे झालेल्या पावसामुळे नदीला पूर आला होता यातच कडभनवाडी, कोल्हेवाडी, वराट वस्ती, कवडवाडी परिसरातील नागरिक यांचा संपर्क तुटला होता. अनेक दुधवाले व विद्यार्थी अडकले होते. सकाळी आठ वाजता जेसीबीच्या साहाय्याने दुधवाले व काही नागरिकांना नदीच्या दुसऱ्या किनारी सोडले.
Web Title: Heavy rain in city, people evacuated with help of JCB
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study