अकोले आढळा परिसरात मुसळधार पाउस, ओढे-नाल्यांना पूर
Breaking News | Akole: दुपारी जोरदार पाऊस झाला. ठिकठिकाणी शेतात पाणी साचले. वीरगाव येथील खरीप मका पिकात पाण्याचे तळे साचले. धामणगाव आवारी परिसरात ओढे-नाल्यांना पूर.
अकोले: तालुक्यातील आढळा परिसरात बुधवारी (दि. २६) दुपारी जोरदार पाऊस झाला. ठिकठिकाणी शेतात पाणी साचले. वीरगाव येथील खरीप मका पिकात पाण्याचे तळे साचले. धामणगाव आवारी परिसरात ओढे-नाल्यांना पूर, मक्याची पिके गेली पाण्यात.
दुपारी तब्बल दीड तास दमदार पाऊस झाला. या दमदार पावसाने काही वेळातच सर्वत्र पाणीच पाणी केले, तर शेतातसुद्धा बऱ्याच ठिकाणी पाणी साचले होते.
अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी, घोरपडवाडी, तळेवाडी, ढगेवाडी, शिदवड या भागातील या पावसाळ्यातील हा पहिलाच दमदार पाऊस झाला. जोरदार पावसाने हजेरी लावल्याने ढगेवाडी भागातील ओढेही वाहते झाले. शेतातील बांधही तुडुंब भरले.
अकोले तालुक्यातील आढळा परिसरात आज दुपारी जोरदार पाऊस झाला. संध्याकाळी पाऊस थांबल्यावर शेतकरी आनंदाने शिवारात पाहणी करत होते. येथील परिसरात, वीरगाव, देवठाण, पिंपळगाव निपाणी, डोंगरगाव या गावांमधील शेतांना काही काळ तळ्यांचे स्वरूप आले होते. अतिरिक्त वाहत्या पाण्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे शेताचे बांध फुटून नुकसान झाले आहे. नुकत्याच रोपांच्या अवस्थेत असलेल्या मका, बाजरी, कोथिंबीर अशा अनेक खरीप आणि भाजीपाला पिकांच्या शेतात पाणी साचले होते. परिसरात डोंगर-कड्यांवरून पाणी कोसळत होते. ओढ्या नाल्यांनाही पाणी वाहत होते.
सध्या पेरण्यांना उशीर झाला असला तरी बुधवारी झालेल्या पावसाने जमिनीचा वापसा झाल्यावर चार-पाच दिवसांत पेरण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. रस्त्यांवर चिखल व डबक्यांमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र, खरिपाला जीवदान मिळाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
Web Title: Heavy rain in Akole Adha area
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study