मुसळधार पाऊस ! वीज पडून चौघांचा मृत्यू
रभणी आणि नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली असून विविध ठिकाणी वीज (lightning) पडून झालेल्या दुर्घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू.
परभणी | नांदेड : परभणी आणि नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली असून विविध ठिकाणी वीज पडून झालेल्या दुर्घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले आहेत. तसेच, नांदेड जिल्ह्यात २८ सप्टेंबर रोजी वीज पडून ६ जनावरे दगावली आहेत.
गंगाखेड (जि. परभणी) तालुक्यातील डोंगर पिंपळा येथे सविता विठ्ठल कतारे (४०) व निकिता विठ्ठल कतारे (१८) या मायलेकींचा अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाला. भेंडेवाडी ओंकार किशन घुगे (१४) या मुलाचाही अंगावर वीज पडून मृत्यू झाला, तर त्याच्यासोबतचे तीन जण जखमी झाले. त्यांच्यावर गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत.
नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यातील नागसवाडी येथे शुक्रवारी शेतात काम करीत असताना वीज अंगावर पडून एक शेतकरी ठार झाला तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. साईनाथ दत्ता घुगे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. बिलोली तालुक्यातील किनाळा येथे वीज पडून सिद्धार्थ मरिबा मोरे आणि माधव गणेश भोसले हे दोन युवक जखमी झाले आहेत.
Web Title: Heavy rain Four died due to lightning
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App