Home अहमदनगर अहमदनगर: तेल कंपनीला भीषण आग, ५० लाखांचे नुकसान

अहमदनगर: तेल कंपनीला भीषण आग, ५० लाखांचे नुकसान

Ahmednagar News:  अहमदनगर शहराजवळील केडगाव येथील साईराज इंडस्ट्रीज या तेल कंपनीला रविवारी सायंकाळी आग (Fire) लागली. ५० लाखांचे नुकसान.

Heavy fire to oil company, loss of 50 lakhs

अहमदनगर: केडगाव औद्योगिक वसाहतीमधील साईराज इंडस्ट्रीजमधील तेल कंपनीला रविवारी सायंकाळी अचानक आग लागली. रविवार असल्याने कंपनी बंद होती. त्यामुळे जीवितहानी झाली नसली तरी कंपनीचे अंदाजे ५० लाखांचे नुकसान झाले.

केडगाव औद्योगिक वसाहतीमधील राहुल भंडारी यांच्या मालकीची साईराज इंडस्ट्रीज नावाची तेल प्रक्रियासंबंधित कंपनी आहे. रविवारी कंपनी बंद होती. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अचानक कंपनीतून धुराचे लोळ येण्यास सुरुवात झाली. शेजारील कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली. माजी नगरसेवक दिलीप सातपुते, नगरसेवक अनिल शिंदे, मनोज कोतकर यांनी तत्काळ महापालिकेच्या अग्निशमन दलास संपर्क केला. त्यातील एक गाडी दाखल झाली. त्या गाडीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. महापालिकेच्या अग्निशमन विभागाची दुसरी गाडी आणण्यास खूप मदत झाली. नादुरुस्त असल्याने वेळेत पोहोचू शकली नाही. सावेडी अग्निशामक दलाची गाडी वेळेत पोहोचली नाही. महानगरपालिकेच्या पाण्याच्या टँकरने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम प्रगतिपथावर सुरू केले. एमआयडीसी अग्निशमन विभागाची गाडी दाखल झाली आणि आग आटोक्यात आणण्यात यश आले. अग्निशमन अधिकारी नितीन जाधव, राहुल भालगावकर, गणेश कदम, संदीप खांबट, संतोष आव्हाड यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अग्निशामक दलाच्या गाड्यांची वाट पाहत शेजारी नागछाप हिंग कंपनीच्या पाण्याच्या टाकीमधून पाणी मिळाल्यामुळे आग आटोक्यात आणण्यात आली.

रविवारी साईराज तेल कंपनीला सुटी असूनही नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Web Title: Heavy fire to oil company, loss of 50 lakhs

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here