मराठा आरक्षणबाबत क्युरेटिव्ह पीटिशनबाबत सुनावणी पूर्ण, आज निर्णय येण्याची शक्यता
Maratha Reservation: मराठा आरक्षणबाबत दाखल क्युरेटिव्ह पीटिशनबाबत सुनावणी पूर्ण झाली असून सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. याप्रकरणी आज रात्रीपर्यंत निर्णय येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Maratha Reservation: मराठा आरक्षणावरील क्युरेटिव्ह पिटीशनवरील सुनावणी पूर्ण झालेली असून सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
मराठा आरक्षणावरील क्युरेटिव्ह पिटीशनवरील न्यायालयाचा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवरून कळणार आहे. याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही. किंवा या याचिकेतील जे पक्षकार आहेत, त्यांनाही तो ईमेलवरून निर्णय कळवला जाईल, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांनी दिली. न्यायालयाचा हा निर्णय आज संध्याकाळपर्यंत अपेक्षित आहे. पण कधी-कधी एक-दोन दिवसही लागू शकतात. निर्णय झालेला आहे. तो प्रकाशित कधी होतो, त्याकडे लक्ष आहे. पण आज संध्याकाळपर्यंत निर्णय लागेल अशी अपेक्षा आहे, असे वकील सिद्धार्थ शिंदे म्हणाले.
कसा असू शकतो निकाल?
पहिली बाब म्हणजे क्युरेटिव्ह पिटीशन फेटाळली जाऊ (डिसमिस ) शकते. दुसरी म्हणजे या प्रकरणी नोटीस बजावली जाऊ शकते. आणि तिसरे पर्याय या प्रकरणी खुली सुनावणीही सर्वोच्च न्यायालय घेऊ शकते. या सुनावणीसाठी न्यायालयाकडून तारीखही दिली जाऊ शकते, असे तीन पर्याय आहेत.
न्यायालयाचा निकाल एक ओळीचाच असेल म्हणजे फेटाळली गेली तर डिसमिस झाले असे असेल. दुसरा पर्याय, नोटीस असेल तर नोटीस दिली जाईल. तिसरा म्हणजे खुली सुनावणी घ्यायची असेल तर ती न्यायालयाच्या सुनावणीत घेतली जाईल. हा काही सविस्तर असा निकाल नसेल, असे ते पुढे म्हणाले.
Web Title: Hearing on a curative petition regarding Maratha reservation completed
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App